DA Hike
DA Hike

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; महागाई भत्त्यात वाढ करण्याचा शिंदे सरकारचा निर्णय

मुंबई- महाराष्ट्रातील शिंदे सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Eknath shinde Govt Increase Dearness Allowance Diwali 2023 gift to government employee Maharashtra cabinet Meeting knp94)

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांना महागाई भत्ता ४२ टक्के झाला होता. पण, आता शिंदे सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेण्याची तयारी केल्याचं दिसतंय. त्यामुळे त्यांच्या महागाई भत्त्यात आणखी चार टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. यामुळे त्यांचा महागाई भत्ता आता ४६ टक्के होईल.

DA Hike
Old Pension March : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्य सरकारी कर्मचारी संपातून माघार

साधारणपणे वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात येत असतो. याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जून महिन्यामध्ये वाढवला होता. केंद्र सरकारने देखील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना ४६ टक्के महागाई भत्ता मिळतो. त्यांच्या महागाई भत्त्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com