Eknath Shinde: शिंदे गटाकडून दसऱ्यापूर्वीच आदित्य ठाकरेंना जबरदस्त ‘हादरा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Ekanth Shinde , Thackeray family uddhav thackeray Aditya thackeray mumbai

Eknath Shinde: शिंदे गटाकडून दसऱ्यापूर्वीच आदित्य ठाकरेंना जबरदस्त ‘हादरा'

मुंबई – एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने उद्धव ठाकरे गटाला हादरे देत आहे. सत्ता काबीज केल्यानंतर देखील शिंदे गटातील इनकमिंग थांबलेली नाही. त्यातच दसरा मेळाव्यात आणखी काही आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शिंदे गटाकडून दसऱ्यापूर्वीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना हादरा देण्यात आला आहे. (Ekanth Shinde news in Marathi)

हेही वाचा: Video : अमित शहांनी कॅमेऱ्यासमोरच मुलाला झापलं? काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर करत दावा

शिवसेनेवर वर्चस्व मिळविल्यानंतर शिंदे गटाने युवासेना नियंत्रणाखाली घेण्याचं निश्चित केल्याचं आज युवासेना कार्यकरणी जाहीर केल्यामुळे स्पष्ट झालं आहे. राज्यातील युवासेनेची कार्यकारणी शिंदे गटाने जाहीर केली आहे.

यामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या युवासेना प्रमुखपदी अविष्कार भुसे, मराठवाडा युवासेना प्रमुखपदी अभिमन्यू खोतकर आणि अविनाथ खापे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांच्या युवासेना प्रमुखपदी अनुक्रमे विकास गोगावले, रुपेश पाटील आणि राम राणे यांना नियुक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा: दरवेळी चर्चा होते पण Pankaja Munde भाजप सोडणार तरी कधी ?

दरम्यान पश्चिम महाराष्ट्र युवासेनेची धुरा किरण साली आणि सचिन बांगर यांच्याकडे सोपविण्यात आली. तर कल्याण-भिवंडीची जबाबदारी दीपेश म्हात्रे आणि प्रभुदास नाईक, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरच्या युवासेना प्रमुखपदाची जबाबदारी नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर मुंबईत समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे आणि प्रयाग लांडे हे युवासेनेचं काम पाहणार आहे. तर विदर्भाची धुरा ऋषी जाधव आणि विठ्ठल सरप पाटील हे सांभाळणार आहेत.