Eknath Shinde: मुहूर्त ठरला! गुवाहाटी दौरा पार पडताच मंत्रीमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

expansion of the cabinet news in Marathi

Eknath Shinde: मुहूर्त ठरला! गुवाहाटी दौरा पार पडताच मंत्रीमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग

मुंबई - राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन तीन महिन्याहून अधिक काळ उलटला आहे. मात्र शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप रखडलेला आहे. मागील अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार अशी चर्चा होती. आता मंत्रीमंडळाच्या विस्ताराची तारिख ठरली आहे. (expansion of the cabinet news in Marathi)

हेही वाचा: Gopichand Padalkar: ...तर आमदार, खासदार होता येतंच; पडळकरांचा एमपीएससी करणाऱ्यांना अजब सल्ला

अधिवेशनाआधी मंत्रीमंडळ विस्तार आणि महामंडळांच्या वाटपासाठी आमदारांचा दबाव होता. त्यामुळे आता १३ डिसेंबर रोजी मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात आज बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तार आणि महामंडळांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. याबाबत साम टिव्हीने वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: मोदी-शाह सोडवणार महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न? दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत घेणार बैठक

शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात एकाच मंत्र्याकडे अनेक विभागाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. तसेच अनेक नेत्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारामुळे आता इच्छूकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.