
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे या निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांपासून सत्ताधारी सगळेच कंबर कसून कामाला लागले आहेत. आता सत्ताधारी सत्तेत जरी एकत्र असले तरी जेव्हा विषय आला स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता गाजवायचा तेव्हा मात्र तुझं तु माझं मी असं म्हणत राजकीय कुरघोडी तसेच खेळी सुरु आहे. भाजप आपली रणनिती आखत आहे. तर अजितदादा वेगळी फिल्डिंग लावत आहेत. दोन्ही पक्षात इनकमिंगचा जोरदार धडाका सुरु आहे. पण शिंदे मात्र अस्वस्थ आहेत. कारण ही इनकमिंग त्यांच्या नेत्यांच्या मतदारसंघात सुरु आहे.