CM Eknath Shinde : एखाद्या जाहिरातीमुळे युती तुटणार नाही; मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा

‘शासन आपल्या दारी’तून लाभार्थींना लाभाचे वितरण
eknath shinde on ad row an advertisement by over enthusiastic party worker will not weaken shiv sena bjp alliance politics
eknath shinde on ad row an advertisement by over enthusiastic party worker will not weaken shiv sena bjp alliance politicssakal
Updated on

पिंपरी : ‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी एकच आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती एका विचाराने झालेली आहे. एखाद्या जाहिरातीमुळे ती तुटणार नाही,’’ असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. प्रसार माध्यमात नुकतेच प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील छायाचित्रांवरून भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमधून उमटलेल्या प्रतिक्रियांवर त्यांनी स्पष्टीकरण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार काम करत आहे. जगभरात आपल्या देशाचे नाव मोदी मोठे करतात. ८४ टक्के नागरिकांनी त्यांना पसंती दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत सरकारच्या व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध योजनांच्या लाभार्थींना विविध दाखल्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले. त्यावेळी ते बोलत होते. थेरगावमध्ये झालेल्या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे आदी उपस्थित होते.

eknath shinde on ad row an advertisement by over enthusiastic party worker will not weaken shiv sena bjp alliance politics
Ashadi Wari 2023 : सासवडमधून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा निघताना भंडाऱ्याची उधळण व पावसाची हजेरी

शिंदे म्हणाले, ‘‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गुंतवणुकीत राज्य प्रथम क्रमांकावर होते. नंतरच्या सरकारच्या काळात स्थान घसरलं होतं. आता गेल्या ११ महिन्यात एक लाख १८ हजार कोटींची परकीय गुंतवणूक राज्यात झाली आहे.

पूर्वीचे सरकार घरी बसून निर्णय घेत होते. आमचं सरकार नागरिकांना लाभ देण्यासाठी त्यांच्या दारी आलं आहे. कोरोनाचे सर्व प्रतिबंध आम्ही उठवले. त्यामुळे कोरोना पळून गेला आहे. आमचं सरकार खोटं काम करत नाही. आम्ही घरात बसून आदेश देत नाही. प्रत्यक्ष बघतो, लोकांमध्ये फिरतोय. ‘शासन आपल्या दारी’ घेऊन आलोय. त्यामुळे ‘हे असंच चालू राहिलं तर, आपलं काही खरं नाही,’ अशी विरोधकांना भीती आहे.’’

eknath shinde on ad row an advertisement by over enthusiastic party worker will not weaken shiv sena bjp alliance politics
Shiv Sena-BJP Controversy: '५० कुठं आणि १०५ कुठं?' शिवसेना-भाजप वाद पेटवणारा बॅनरच गेला चोरीला !

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

  • एक एप्रिलपासून ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून राज्यात ३५ लाखांवर नागरिकांना लाभ

  • संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि पुणे-मिरज लोहमार्गाच्या भूसंपादनाची कामे पूर्ण

  • पुणे जिल्ह्यातील १०४ शिबिरांद्वारे दोन लाख ८६ हजार २७८ लाभार्थींना २८६ कोटी रुपये वाटप

  • १८ हजार कोटींच्या ४७ सिंचन योजना आणल्याने सात लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार

  • जेजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी १०९ कोटी आणि वढू बुद्रूक येथे संभाजी महाराज स्मारकाच्या कामासाठी २६९ कोटी रुपये

  • यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी पाच कोटी रुपये देणार

  • मुळा, पवना, इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जलशुद्धीकरण, व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी निधी

eknath shinde on ad row an advertisement by over enthusiastic party worker will not weaken shiv sena bjp alliance politics
Eknath Shinde : ती जाहिरात विरोधकांनी दिली होती का? CM शिंदेंनी दिलं ९ मिनिटाच्या अबोल्यावर स्पष्टीकरण

मुख्यमंत्री - आमदार बनसोडे यांच्या भेटीची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन चहापान केले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे उपस्थित होते. बनसोडे हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून ते नाराज असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मंत्रालय ते ठाण्यापर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाडीतून प्रवास केला होता. आजही शिंदे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com