
रत्नागिरी : राज्यातील महायुती सरकार स्थगिती सरकार नव्हे, तर समृद्धी आणि प्रगतीचे सरकार आहे. कोकणात बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणात आहे. या बुद्धिमत्तेचा पर्यटन आणि शेती क्षेत्रात उपयोग करून घेतला पाहिजे. येथील शेतकरी रोजगारासाठी दुसरीकडे जाता कामा नये आणि गेलेला पुन्हा आला पाहिजे, असे नियोजन केले पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कोकण विकासाचा अनुशेष भरून काढू, असेही त्यांनी आश्वासन दिले. नागरी सुविधा योजनांतर्गत ८० सीएनजी घंटागाड्यांच्या लोकार्पण व शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला.