राजीनामा द्यायचा की नाही हा निर्णय उद्धव ठाकरेंचा - एकनाथ शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Uddhav Thackeray

राजीनामा द्यायचा की नाही हा निर्णय उद्धव ठाकरेंचा - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. शिवसेनेने भाजपासोबत सरकार बनवावं, मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे.आज दुपारी शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार असून आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, शिंदे यांनी माध्यांशी व्हिडीओ कॉद्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार का असा सवाल केला असता राजीनामा द्यायचा की नाही हा निर्णय उद्धव ठाकरेंचा आहे. असे उत्तर शिंदें यांनी यावेळी दिले.

माध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांनी आगामी भुमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले, संध्याकाळच्या बैठकीनंतर पुढचा निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात सवाल केला असता राजीनामा द्यायचा की नाही हा ठाकरेंचा निर्णय आहे. संख्याबळ कितपत असा सवाल केल्यानंतर त्यांनी गरजेपेक्षा अधिक संख्याबळ आमच्याकडे आहे. असा दावा केला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मविआ सरकार बरखास्त होणार असल्याचे संकेत दिले. त्यानंतर राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार या चर्चेला उत आला.

सध्या आमच्यासोबत 6-7 अपक्ष आमदारांसह 46 आमदार आहेत. बाकीचे शिवसेनेचे आमदार आहेत. या आकड्यामध्ये वाढ होणार आहे. आत्तापर्यंत आम्हाला भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही किंवा आम्ही त्यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. असे स्पष्ट शिंदे यांनी यावेळी केले.

तसेच, सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मी म्हणेन की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत आणि यापुढेही शिवसैनिक राहू. असा दावाही त्यांनी यावेळी केला.

यासोबतच कोणत्याही आमदाराला मारहाण झाली नसल्याचे शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

Web Title: Eknath Shinde Said That It Is Up To Uddhav Thackeray To Decide Whether To Resign Or Not Political Crisis In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top