
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिठी नदी गाळ काढण्याच्या प्रकल्पातील अनियमिततांवरून विरोधकांवर थेट हल्ला चढवला. यावेळी त्यांनी बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाच्या नावाचा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. “डिनोने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा ‘मोरया’ होईल,” असा टोला लगावत शिंदेंनी सभागृहात खळबळ उडवून दिली.