
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील ऑटो-रिक्षा चालकांनी राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी ठाणे महानगरपालिकेसमोर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल जेव्हा ते उपजीविकेसाठी तीनचाकी ऑटो रिक्षा चालवत होते त्याबद्दल वक्तव्य केले होते.
ठाणे महानगरपालिकेच्या समोर लावण्यात आलेल्या बॅनरवर “होय, आम्हाला अभिमान आहे, आमचा रिक्षावाला (ऑटो चालक) मुख्यमंत्री झाला,” असे मराठीतील बॅनरवर लिहिले आहे. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या (TMC)समोर सुमारे100 ऑटोचालक देखील मेळाव्यात सहभागी झाले तसेच य़ा ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. यासोबतच चालकांनीही आपल्या वाहनांवर देखील ही घोषणा असलेले स्टिकर्स देखील चिकटवले.
एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. ते ऑटो ड्रायव्हर असल्यापासून त्याला आमच्या समस्या माहीत आहेत. इंधनाचे दर जास्त आहेत आणि आशा आहे की ते कमी करण्यासाठी तो प्रयत्न करतील असे एका रिक्षा चालकाने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले.
मंगळवारी ठाकरे म्हणाले होते की भारतीय जनता पक्ष (BJP) महाविकास आघाडीच्या (MVA) नेतृत्वाखालील राज्य सरकारला तीनचाकी सरकार म्हणत होते, पण आता तीनचाकी चालवणाऱ्या व्यक्तीने (एकनाथ शिंदे) राज्याच्या सर्वोच्च पदावर ताबा घेतला आहे. यावर बुधवारी, शिंदे म्हणाले होते की एका ऑटोरिक्षाने आता मर्सिडीज कारला मागे टाकले आहे, दरम्यान शिंदे यांच्या त्यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे यांचे सरकार पडल्याच्या पाऱ्श्वभूमिवर "ऑटोरिक्षाने मर्सिडीज (कार)ला मागे टाकले... कारण हे सर्वसामान्यांचे सरकार आहे," असे एकनाथ शिंदे यांनी मराठीत ट्विट केले होते
एकनाथ शिंदे हे सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाहासाठी ऑटोरिक्षा चालवत असत. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी २९ जून रोजी राजीनामा दिला होता. दुसऱ्या दिवशी ३० जून रोजी शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यादरम्यान ठाकरे स्वत: मर्सिडीज कार चालवून राजीनामा देण्यासाठी राजभवनात पोहोचले होते.
महत्वाचे म्हणजे या ट्वीट मध्ये 'मर्सिडीज'चा संदर्भ असा आहे की, जेव्हा ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांनी मर्सिडीज चालवून राजभवन गाठले आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सादर केला. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आदित्य ठाकरे यांच्यावर ‘मर्सिडीज बेबी’ असे म्हणत 1990 मध्ये अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या आंदोलनात भाग घेतलेल्या ‘कारसेवकां’च्या संघर्षाचे कौतुक करू शकत नाहीत अशा शब्दात टीका केली होती. .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.