
शरद पवारांच्या भेटीसंदर्भात एकनाथ शिंदेंचा खुलासा; म्हणाले...
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांची काल मध्यरात्री भेट झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यानंतर राज्यात अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या बातमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी ट्वीट करत खुलासा केला आहे. त्यामुळे सकाळपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. (Eknath Shinde News In Marathi)
शिंदे यांनी टवीट करत म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.(Sharad Pawar News)
विधानपरिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर व्हाया सुरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करून शिंदे गट महाराष्ट्रात दाखल झाले. त्यानंतर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारलं. यानंतर विधानसभेत शिंदे-फडणवीसांनी एकहाती विश्वासदर्शक ठरावही जिंकला. यावेळी पार पडलेल्या आभार भाषणादरम्यान, शिंदे भावूक, स्पष्टवक्ते आणि आक्रमक भूमिकेत दिसून आले.
Web Title: Eknath Shinde Tweet Over Sharad Pawar Meeting Photo Viral On Social Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..