Witch craft Violence : जादूटोण्याच्या संशयावरून ज्येष्ठ महिलेची धिंड; रेट्याखेडा गावातील चौघांना अटक
Witch craft Violence : चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा गावात जादूटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षांच्या महिलेला लोखंडी सळईने मारहाण केली गेली आणि तिची धिंड काढण्यात आली. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
चिखलदरा : जादूटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षांच्या महिलेला मारहाण करून लोखंडी सळईने चटके देण्यात आल्यानंतर तिची गावातून धिंड काढण्यात आली. हा संतापजनक प्रकार चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा गावात घडला. या घटनेत पोलिसांनी शनिवारी चौघांना अटक केली.