

Election Voting Ink
ESakal
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत मतदान केल्यानंतर बोटाला लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगाने खूण करण्यात येणाऱ्या मार्कर पेनमध्ये वापरण्यात आलेल्या कथित निकृष्ट दर्जाच्या शाईबाबत मार्कर पुरविणाऱ्या ‘कोरेस’ या कंपनीचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मार्कर पेनऐवजी जुन्या पद्धतीने शाई लावली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.