MLC Election: विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जानेवारी अखेरीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLC Election: विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जानेवारी अखेरीस

MLC Election: विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जानेवारी अखेरीस

विधानपरिषदेतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच सदस्यत्वाची मुदत 7 जानेवारी 2023 ला संपत असल्यामुळे या रिक्त जागांसाठी जानेवारी अखेर निवडणूक होणार आहे. शिक्षक आमदार काळे हे संभाजीनगर, बाळाराम पाटील (कोकण) तर गाणार नागपूर पदवीधर आमदार डॉ. पाटील अमरावती, तर डॉ. तांबे हे नाशिक या पाचही आमदारांच्या विधान परिषद सदस्यत्वाची 7 जानेवारी 2023 रोजी मुदत संपत आहे.

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकार आणि राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्यामुळे निवडीसाठी जोरदार तयारी केली आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मागील निवडणुकीची मतदार यादी वापरली जात नाही. त्यामुळे १ ऑक्टोबर २०२२ रोजी नवीन यादी तयार केली जाणार आहे. २३ नोव्हेंबरला मतदार यादीचा प्रारूप मसुदा जाहीर करून ३० डिसेंबरला अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मागील निवडणुकीची मतदार यादी वापरली जात नाही. त्यानुसार 1 ऑक्टोबर रोजी नवीन यादी तयार करून 23 नोव्हेंबर रोजी मतदार यादीचा प्रारूप मसुदा जाहीर केला जाणार आहे. तर 30 डिसेंबर रोजी अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी पदवी प्राप्त होऊन तीन वर्षे पूर्ण तसेच मतदारसंघात नाव असणे आवश्यक आहे. तर शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवाराने मागील सहा वर्षांत किमान तीन वर्षे शिकवलेले असावे, अशी उमेदवारांसाठी अट असल्याचे निवडणूक आयोगातील अधिकाऱ्याने सांगितले आहे.

टॅग्स :election