Maharashtra Municipal Election 2022 : राज्यात तीन टप्प्यांत निवडणुका? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elections in Maharashtra state in three phases

Maharashtra Municipal Election 2022 : राज्यात तीन टप्प्यांत निवडणुका?

सोलापूर - राज्यातील २५ जिल्हा परिषदा, १८ महापालिका, दोन हजार १६४ नगरपरिषदा, नगरपालिका, २८४ पंचायत समित्या आणि आठ ते दहा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. उपलब्ध मनुष्यबळ (यंत्रणा) आणि आचारसंहिता कालावधीचा विचार करता या निवडणुका तीन टप्प्यांत होतील. २० सप्टेंबर ते २० डिसेंबरपर्यंत ग्रामपंचायती वगळता सर्वच निवडणुका दोन टप्प्यात घेतल्या जाण्याची लक्षणे आहेत.

जळगाव, पुणे, सोलापूर, जालना, बीड, उस्मानाबाद, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, लातूर, बुलढाणा या जिल्ह्यांतील जवळपास दोन हजार १६४ नगरपरिषदा व नगरपंचायती, नगरपालिकांसह २८४ पंचायत समित्या आणि डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंत मुदत संपणाऱ्या जवळपास आठ ते दहा हजार ग्रामपंचायतींचीही निवडणूक घ्यावी लागणार आहे. ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण मिळाल्याने आणि पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने केलेला प्रभागरचनेतील बदल शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केल्याने आरक्षण आणि प्रभागरचनेची प्रक्रिया पुन्हा नव्याने पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी किमान २० ते २२ दिवस लागणार आहेत.

मार्च महिन्यात मुदत संपूनही अद्याप जिल्हा परिषदा व महापालिकांची निवडणूक झालेली नाही. लोकशाहीत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक असणे हितावह नाही. त्यामुळे आता ऑगस्टअखेर पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

निवडणुकीचे मुदत संपलेल्या १८ महापालिका

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर या महापालिकांची आता निवडणूक होणार आहे.

निवडणूक होणाऱ्या २५ जिल्हा परिषदा

अमरावती, चंद्रपूर, सातारा, जालना, रत्नागिरी, बीड, कोल्हापूर, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे, नांदेड, बुलढाणा, औरंगाबाद, वर्धा, लातूर, नाशिक, जळगाव, सोलापूर, नगर, यवतमाळ, रायगड, गडचिरोली या जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत.

संभाव्य टप्पे…

  • पहिला टप्पा (२० सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर) : १८ महापालिका आणि दोन हजार १६४ नगरपरिषदा, नगरपालिका

  • दुसरा टप्पा (१० नोव्हेंबर ते २० डिसेंबर) : २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समित्या

  • तिसरा टप्पा (फेब्रुवारी ते मार्च २०२३) : राज्यातील ८ ते १० हजार ग्रामपंचायती

मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा एक टप्पा किमान ४० दिवसांत पूर्ण होऊ शकतो. आरक्षण व प्रभागरचना अंतिम करण्याच्या प्रक्रियेला १५ ते २० दिवस लागतील.

- भारत वाघमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर.

Web Title: Elections In Maharashtra State In Three Phases

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..