esakal | वीजबील थकबाकीची वसुली न झाल्यास राज्य अंधारात जाईल - नितिन राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

nitin raut

राऊत म्हणाले की, आधीच्या सरकारने थकबाकीचा डोंगर वाढवून ठेवला. आता कोरोना, अतिवृष्टी या परिस्थितीमुळे वसुली करता आली नाही.

वीजबील थकबाकीची वसुली न झाल्यास राज्य अंधारात जाईल - नितिन राऊत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - राज्याचे उर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीजबीलाची थकबाकी वसूल झाली नाही तर राज्य अंधारात जाईल असा गंभीर इशारा दिला आहे. वीजबीलाची थकबाकी ही ७९ हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. त्यासंदर्भात महावितरणचं प्रेझेंटेशन सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आलं. यामध्ये आधीच्या सरकारने बाकी ठेवलेली वसुलीबाबतही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी यावर उपाय व योजना काय करता येतील याबाबत अहवाल तयार करण्यास सांगितलं असल्याची माहिती नितिन राऊत यांनी दिली.

थकबाकी आणि वसुलीचा अहवाल हा राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल. तसंच थकबाकीकडे गांभीर्याने पाहिलं नाही तर राज्य अंधारात जाईल अशा इशाराही नितिन राऊत यांनी दिला. उर्जा विभागातील मोठी वसुली अद्याप रखडली असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

भाजप सरकारच्या कार्यकाळात थकीत असलेली बिले आता कॅरीफॉरवर्ड झाली असल्याचं नितिन राऊत यांनी सांगितलं. राऊत म्हणाले की, आधीच्या सरकारने थकबाकीचा डोंगर वाढवून ठेवला. आता कोरोना, अतिवृष्टी या परिस्थितीमुळे वसुली करता आली नाही. त्यामुळे भार अधिक वाढला आहे. महावितरण आर्थिक दृष्ट्या नफ्यात येईल, यावर विचार करण्याची गरज आहे असे नितिन राऊत म्हणाले.

loading image
go to top