
शासनाच्या निकषांनुसार कार्यवाही होईल
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व निकषांचा आधार घेऊन प्राथमिक शाळा सुरु केल्या जातील. त्यात कोरोनामुक्त गावांना प्राधान्य राहिल.
- संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, सोलापूर
सोलापूर : नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु केल्यांनतर आता शालेय शिक्षण विभागाने आता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचे नियोजन सुरु केले आहे. मात्र, सर्वप्रथम ज्या गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, अशा गावांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर मागील 14 दिवसांत ज्या गावांमध्ये रुग्णच आढळला नाही, अशा गावांमधील प्राथमिक शाळाही स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून सुरु होतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. लहान मुले असल्याने त्यांची वेळ दोन शिफ्टमध्ये दोन ते तीन तासांपुरतीच ठेवण्याचेही नियोजन असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मात्र, प्राथमिक शाळा जानेवारी की फेब्रुवारीनंतर सुरु होतील, यावर अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याचेही सांगण्यात आले.
शासनाच्या निकषांनुसार कार्यवाही होईल
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व निकषांचा आधार घेऊन प्राथमिक शाळा सुरु केल्या जातील. त्यात कोरोनामुक्त गावांना प्राधान्य राहिल.
- संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, सोलापूर
सोलापूरसह राज्यभरात नववी ते बारावीपर्यंतच्या 22 हजार 204 शाळा असून त्यात 56 लाख 48 हजार 28 विद्यार्थी प्रवेशित आहेत. 23 नोव्हेंबरपासून हे वर्ग सुरु झाले आहेत. त्यानुसार राज्यातील सुमारे साडेअकरा हजार शाळा सुरु झाल्या असून सव्वापाच लाखांपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील 16 दिवसांत सर्वच विद्यार्थी कोरोनापासून सुरक्षित राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता कोरोनामुक्त असलेली व कोरोनामुक्त झालेल्या गावांची यादी तयार करुन त्याठिकाणी प्राथमिक शाळा सुरु करण्याच्यादृष्टीने चाचपणी सुरु झाली आहे. शाळा सुरु होताना तथा झाल्यानंतर यापूर्वीचेच बहुतेक निकष ठेवले जातील.
कोरोना लाटेतही संसर्गापासून दूर असलेली गावे
करमाळा : सातोली, भाळवणी, रामवाडी, कावळवाडी, गोयेगाव, पोंधवडी, टाकळी.
अक्कलकोट : हिळ्ळी, मराठवाडी, ममदाबाद, चिक्केहळी, ईटगा, रामपूर, नागूर, ब्यागेहळ्ळी, कोनाळी, जकापूर, दहिटणेवाडी, हालहळी, हसापूर, शिरसी, शिरवळवाडी.
माढा : हटकरवाडी, चव्हाणवाडी (मा.), महादेववाडी, गवळेवाडी, लोणी, जाखले, गार अकोले.
बार्शी : गोडसेवाडी, भन्साळे, टोणेवाडी, वाघाचीवाडी, आश्रम तांडा, येमाई तांडा, आंबेगाव, भांडेगाव, चिंचखोपन, तावरवाडी.
दक्षिण सोलापूर : संगदरी, गंगेवाडी, उळेवाडी, बाळगी, खानापूर, शिर्पनहळ्ळी, हणमगाव, वडगाव, गुर्देहळ्ळी, तोगराळी, आलेगाव, सावतखेड, चिंचपूर, कुडल.
मोहोळ : कुरणवाडी, कोथाळे, वरकुटे, नांदगाव, अर्धनारी, शिरापूर (मो.) जामगाव खुर्द, तरटगाव, सिध्देवाडी, पासलेवाडी.
सांगोला : बोपसेवाडी, गावडेवाडी, काळुबाळुवाडी, गुनाप्पावाडी, जाधववाडी (चि), राजापूर, जुनी लोटेवाडी, सातारकर वस्ती, बंडगरवाडी.
मंगळवेढा : मेटकरवाडी, जंगलगी, शिवणगी, लोणार, रेवेवाडी, बणतांडा, सिध्दनकेरी, पडळकरवाडी.
उत्तर सोलापूर : मोहितेवाडी, रानमसले, भागाईवाडी, सेवालालनगर, तरटगाव, पाथरी, समशापूर.
पंढरपूर : सुगाव (खेड), जाधववाडी, खरातवाडी, नळी, पुनर्वसन.