नीरा कालव्यातील पाण्याचे समन्यायी वाटप

nira-canal file pic
nira-canal file pic

मुंबई  - नीरा देवघर आणि गुंजवणी धरणांचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विनावापर राहणारे पाणी समन्यायी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नीरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगिकीकरण, कृषिपूरक उद्योग, साखर कारखाने, फळबागांना होईल.      

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नीरा देवघर धरणाचे काम २००७ मध्ये पूर्ण झाले असून, ११.७३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झालेला आहे व गुंजवणी धरणात २०१८ पासून ३.६९ टीएमसी पाणीसाठा निर्मित झालेला होता. या दोन्ही प्रकल्पांच्या कालव्याची कामे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियोजित लाभक्षेत्रात पाणी वापर होऊ शकत नाही, ही बाब विचारात घेऊन या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने या दोन्ही धरणांत उपलब्ध होणारे, मूळ प्रकल्पाची गरज भागल्यावर शिल्लक राहणारे पाणी नीरा डावा कालवा व नीरा उजवा कालवा यात समन्यायी तत्त्वावर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दहा हजार कोटी आकस्मिकता निधीतून
 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीकरिता दहा हजार कोटी इतका निधी आकस्मिकता निधीतून दिला जाणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. पुढील पंधरा दिवसांत ही योजना राबवायची असल्याने आकस्मिकता निधीतून यासाठी लागणारा निधी वापरला जाणार आहे. महाविकास आघाडीने डिसेंबर महिन्यात खरीप हंगामातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी देखील आकस्मिकता निधी वापरला होता. 

विद्यार्थ्यांना मोफत चष्मे
दृष्टिदोषामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर दूरगामी परिणाम होत असल्याने दृष्टिदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांना चष्मे पुरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टिदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास  आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी सुमारे 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com