
एरंडोल-भरधाव वेगाने जाणा-या टँकरने मोटार सायकलला दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले.मोटारसायकलला धडक दिल्यानंतर फरार झाला.दरम्यान अपघात झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्तारोको आंदोलन करून महामार्ग रोखून धरला.
हा अपघात आज रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अमळनेर नाका जवळील हॉटेल जत्राजवळ झाला.संबंधित अधिकारी जोपर्यंत घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे रात्री उशिरापर्यंत महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.