मोठी बातमी ! "सन्मान निधी'त त्रुटी; शेतकऱ्यांच्या खात्यांची होणार पडताळणी 

तात्या लांडगे
Tuesday, 7 July 2020

दरवर्षी पाच टक्‍के खात्यांची होणार पडताळणी 
जमा झालेल्या पहिल्या हप्त्यामध्ये नोकदार शेतकरी, एकाच कुटुंबात पत्नी-पत्नीला पैसे मिळाले आहेत. आता दरवर्षी पाच टक्‍के खात्यांची पडताळणी केली जाणार आहे. चुकीच्या पद्धतीने पैसे मिळालेल्यांकडून ही रक्‍कम वसूल केली जाणार आहे. 
- जयंत टेकाळे, उपायुक्‍त, कृषी 

सोलापूर : जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना सुरु केली. त्यानुसार फेब्रुवारी 2019 मध्ये राज्यातील 89 लाख 30 हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात एक हजार 785 कोटी 91 लाख रुपयांचा पहिला हप्ता (प्रत्येकी दोन हजारांप्रमाणे) वितरीत झाला. मात्र, या घाईगडबडीत नोकदारांसह एकाच कुटुंबातील पती-पत्नीलाही योजनेचा लाभ मिळाला. त्यामुळे त्या खात्यांची आता पडताळणी होणार आहे. त्यामुळे 2019-20 आणि 2020-21 या वर्षात राज्यातील 60 लाख शेतकऱ्यांचे दोन हजार 96 कोटी 40 लाखांची रक्‍कम केंद्र सरकारने दिलीच नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

 

शेतकरी सन्मान निधीअंतर्गत राज्यातील एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मोठा गाजावाजा करीत मोदी सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये 89 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजारांचा पहिला हप्ता जमा केला. मात्र, घाईगडबडीत सुरु केलेल्या योजनेत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता दरवर्षी योजनेतील पाच टक्‍के खात्यांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

दरवर्षी पाच टक्‍के खात्यांची होणार पडताळणी 
जमा झालेल्या पहिल्या हप्त्यामध्ये नोकदार शेतकरी, एकाच कुटुंबात पत्नी-पत्नीला पैसे मिळाले आहेत. आता दरवर्षी पाच टक्‍के खात्यांची पडताळणी केली जाणार आहे. चुकीच्या पद्धतीने पैसे मिळालेल्यांकडून ही रक्‍कम वसूल केली जाणार आहे. 
- जयंत टेकाळे, उपायुक्‍त, कृषी 

योजनेचा पसारा 

 • पहिला हप्ता मिळालेले शेतकरी 
 • 89.30 लाख 
 • रक्‍कम 
 • 1,785.91 कोटी 
 • दुसरा हप्ता मिळालेले शेतकरी 
 • 88.04 लाख 
 • मिळालेले रक्‍कम 
 • 1,760.89 कोटी 
 • तिसरा हप्ता मिळालेले शेतकरी 
 • 71.53 लाख 
 • वितरीत रक्‍कम 
 • 1,430.62 कोटी

लॉकडाउनमध्ये 32 लाख शेतकऱ्यांनाच दुसरा हप्ता 
कोरोनामुळे केंद्र सरकारने देशभर लॉकडाउन जाहीर केल्याने शेतमाल विक्रीसाठी बळीराजाच्या हातातून बाजारपेठ निसटली. एरव्ही नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या बळीराजासमोर कोरोनाचे नवे संकट उभे राहिले. सरकारकडून सन्मान निधी मिळेल आणि मुलांच्या शिक्षणाला हातभार लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, 2020-21 या वर्षात दोन हजारांचा पहिला हप्ता 60 लाख 88 हजार शेतकऱ्यांना तर 31 लाख 91 हजार शेतकऱ्यांनाच दुसरा हप्ता मिळाला आहे. अद्याप केंद्र सरकारकडून एकविसे कोटी रुपये मिळाले नाहीत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Errors in honors funds will be verified in farmers accounts