
ईसकाळ.कॉम (eSakal.com) मराठी डिजिटल न्यूजमध्ये आघाडीवर पोहोचले आहे. कॉमस्कोरच्या मे २०२५ च्या अहवालानुसार, ईसकाळ.कॉमला १.६५ कोटी युनिक व्हिजिटर्स मिळाले आहेत. यामुळे ते मराठी न्यूज वेबसाईटमध्ये पहिल्या क्रमांकावर आले आहे.
हे यश फक्त आकडेवारीपुरते मर्यादित नाही. तर, वाचकांचा विश्वास, बातम्यांची गुणवत्ता आणि नवीन डिजिटल विचारांचा हा परिणाम आहे. ईसकाळ.कॉमनं विश्वासार्ह, महत्त्वाच्या आणि वाचकांना आवडणाऱ्या बातम्यांच्या जोरावर ही आघाडी घेतली आहे. वाचकांना त्यांच्या गरजेनुसार वेळेवर, अचूक आणि योग्य संदर्भासहित बातम्या देण्यावर ईसकाळ.कॉमनं नेहमीच भर दिला आहे.