Nashik News: नाशिकमधील 'ती' चा सन्मान चळवळ आता राज्यभर! अजित पवारांकडून समर्थन

केवळ कागदावर नव्हे तर कृतीतून 'ती'चा सन्मान करण्याच्या उद्देशाने गेल्या नऊ वर्षांपूर्वी नाशिकच्या इस्पॅलियर स्कूलने अनोखा पुढाकार घेतला.
espalier school initiative In honor of her movement will reach state level nashik news
espalier school initiative In honor of her movement will reach state level nashik news

Nashik News: केवळ कागदावर नव्हे तर कृतीतून 'ती'चा सन्मान करण्याच्या उद्देशाने गेल्या नऊ वर्षांपूर्वी नाशिकच्या इस्पॅलियर स्कूलने अनोखा पुढाकार घेतला. विद्यार्थी, शिक्षक यांनी आपल्या नावानंतर आईचे व त्या पाठोपाठ वडिलांचे नाव लिहिण्यास सुरवात केली.

इतक्यावर न थांबता शाळांमध्ये व विविध व्यासपीठांवर अशा स्वरूपाने नाव लिहिण्याचे आवाहन शाळेतर्फे वेळोवेळी केले जात होते. या मोहिमेला आजवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नाव लिहिण्याची ही पद्धत आता शासनातर्फे लागू केली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. यानिमित्त 'ती'च्या सन्मानार्थ नाशिकमध्ये सुरू झालेली चळवळ राज्यस्तरावर पोहोचणार आहे. (espalier school initiative In honor of her movement will reach state level nashik news)

स्त्री-पुरुष समानता हा विषय निबंधापासून तर अन्य विविध स्तरांवर चर्चिला जातो. दुसरीकडे अनेक घटनांतून महिलांचा मूलभूत हक्कांसाठी संघर्ष हृदयद्रावक ठरतो. या पार्श्वभूमीवर महिलांना समान वागणूक मिळण्याच्या उद्देशाने काय उपाययोजना केल्या पाहिजे यावर नाशिकच्या इस्पॅलियर स्कूलने नऊ वर्षांपूर्वी चर्चा घडविली. विद्यार्थ्यांनी सुचविल्यानुसार आपल्या नावापुढे आईचे नाव व नंतर वडिलांचे नाव लिहिण्याची सूचना यावेळी मांडण्यात आली.

शाळेचे संस्थापक सचिन उषा विलास जोशी यांनी या सूचनेचे स्वागत करत नावातील बदलाची सुरवात स्वतःपासून केली. तेव्हापासूनच विद्यार्थी आपले नाव लिहिताना त्यात आईच्या देखील नावाचा उल्लेख करू लागले. केवळ शाळेपुरता हा उपक्रम मर्यादित राहू नये, म्हणून इतर शाळांना देखील यासंदर्भात आवाहन करण्यात आले.

विशेष म्हणजे आठ वर्षांपूर्वी गुजरात राज्यातील एका शाळेने या सूचनेचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या नावात बदल केला. तेव्हापासून केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिक स्तरावर देखील या मोहिमेची सकारात्मक चर्चा घडून आली. समाज माध्यमांवर अनेक लोकांनी आपल्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करत या चळवळीला बळ दिले.

espalier school initiative In honor of her movement will reach state level nashik news
Nashik Police: खबरदार! गोंगाट कराल तर...; थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांची तंबी

राज्य सरकार लवकरच चौथे महिला धोरण आणणार असून यात नावामध्ये आईच्या नावाचा उल्लेख करण्याचे प्रस्तावित असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. ही आनंददायी बातमी ऐकतानाच नाशिकमधील ही चळवळ राज्यस्तरावर पोहोचत असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.

सर्व कागदपत्रांवर नावाचा उल्लेख

इस्पॅलियर स्कूलतर्फे गेल्या आठ वर्षांपासून येथील विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर प्रशस्तीपत्रावर यासह वह्या, पुस्तके इतकेच नव्हे तर गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला आणि इतर महत्त्वाच्या कायदेशीर कागदपत्रांवर विद्यार्थ्यांच्या नावानंतर आईचे नाव व त्या मागोमाग वडिलांचे नाव लिहिले जात आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येथील शिक्षकांनी देखील स्वयंस्फूर्तीने नावामध्ये सुधारणा करत आदर्श प्रस्थापित केलेला आहे.

"कुटुंबात सन्मान मिळाला तर तिला समाजातही सन्मान मिळेल, या भावनेतून नऊ वर्षांपूर्वी आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या नावापुढे आईचे व नंतर वडिलांचे नाव लिहिण्याची सुरवात केली. आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत इतरही शाळांमध्ये ही मोहीम सुरु झाली. आता राज्य शासन या संदर्भात महिला धोरणात निर्णय घेत असल्याने नाशिकची ही चळवळ राज्यस्तरावर पोहोचत असल्याचा मनस्वी आनंद आहे."- सचिन उषा विलास जोशी, चळवळीचे प्रणेत

espalier school initiative In honor of her movement will reach state level nashik news
Nashik COVID Update : जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’; तातडीच्या बैठकीत आढावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com