मोठी बातमी ! लॉकडाउन काळातही 150 जण "लाचलुचपत'च्या जाळ्यात; पुणे विभाग अव्वल

Corruption.jpg
Corruption.jpg

सोलापूर : देशभरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 22 मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. बहुतांश शासकीय कार्यालय बंद असताना मार्च ते 9 जून कालावधीत 113 गुन्ह्यांमध्ये 150 अधिकारी व कर्मचारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहेत. त्यात पुणे विभाग सलग पाचव्या वर्षी अव्वल असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

लाच प्रकरणांत महसूल आणि पोलिस खात्यातील अधिकारी व कर्मचारी सहा- सात वर्षांपासून सातत्याने प्रथम क्रमांकवरच आहेत. कोरोना महामारीच्या भीतीने लाचखोर घरांत लॉकडाउन असतील, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार ती आशा फोल ठरली आहे. लॉकडाउन काळात मार्च महिन्यात लाच घेण्याची 58 प्रकरणे, तर एप्रिलला सात, मे महिन्यात 30 आणि जूनला 18 प्रकरणे उघडकीस आली आहेत. यामध्ये लाच घेतलेली अथवा मागणी केलेली एकूण रक्‍कम दहा लाखांपर्यंत आहे. तत्पूर्वी जानेवारीत 68 तर फेब्रुवारीत 72 लाचलुचपतचे गुन्हे दाखल झाले आहेत. नागरिकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच देऊ नये, अथवा लाच मागत असल्यास त्याची माहिती तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावी, असे आवाहन सोलापूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांनी केले आहे. 


विभागनिहाय लाचेची महत्त्वाची प्रकरणे (जानेवारी ते 9 जूनपर्यंत) 
महसूल : 64 
पोलिस : 53 
पंचायत समिती : 18 
वन विभाग : 16 
महापालिका : 14 
महावितरण : 12 


लाच घेण्यात पुणे विभागच अव्वल 
पाच- सहा वर्षांपासून लाच प्रकरणांत पुणे विभाग अव्वलच आहे. या विभागातील महसूल, पोलिस, वन विभाग पंचायत समितीसह अन्य काही विभागांतील अधिकारी व कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर कायम आहेत. जानेवारी ते 9 जून 2020 या कालावधीत पुणे विभागातील 62 त्यापाठोपाठ अमरावती 36, नाशिक 34 तर औरंगाबाद 33 नागपूर, नांदेड प्रत्येकी 28, ठाण्यातील 22 तर मुंबईतील 10 प्रकरणांमध्ये एकूण 253 अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना पकडले. 


जानेवारी ते 9 जूनपर्यंतची लाच प्रकरणे 
जानेवारी : 68 
फेब्रुवारी : 72 
मार्च : 58 
एप्रिल : 7 
मे : 30 
9 जूनपर्यंत : 18 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com