Ajit Pawar : आमदार अपात्र ठरले तरी सरकारला काहीही फरक पडणार नाही; अजित पवारांनी मांडलं आमदारांचं गणित

Ajit Pawar News
Ajit Pawar Newsesakal

मुंबईः एकीकडे अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी शिंदे सरकार स्थिर असल्याचं म्हटलं आहे.

मागच्या आठवड्यात अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्याविषयी चर्चा रंगल्या होत्या. राज्याला पहाटेचा शपथविधी चांगलाच ठाऊक असल्याने अजित पवारांबाबत नेहमी वावड्या उठवल्या जातात.

Ajit Pawar News
Ajit Pawar Join BJP: ..म्हणून अजित पवार भाजपला हवे आहेत; राजकीय चर्चांना उधाण

त्यातच आज अजित पवार यांनी शिंदे सरकार स्थिर असल्याचं म्हटलं आहे. भविष्यात १६ आमदार जरी अपात्र ठरले तरीदेखील सरकार स्थिर राहिल, असं म्हणत त्यांनी थेट आकडेवारीचं गणित माडलं आहे.

अजित पवार म्हणाले की, भाजप-शिवसेना आणि अपक्ष मिळून १६५चं संख्याबळ सरकारकडे आहे. १६ आमदार जरी अपात्र ठरले तरी सरकारकडे बहुमताचा आकडा कायम राहणार आहे. असं म्हणून त्यांनी सरकार स्थिर असल्याचं म्हटलं आहे.

दुसरीकडे संजय राऊतांनी दावा केलाय की, शरद पवारांच्या कुटुंबावर भाजप प्रवेशासाठी दबाव येतोय. मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतदेखील शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओकवर गेले होते. त्यावेळी चर्चेदरम्यान अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर शरद पवार काय म्हणाले? याचा खुलासा राऊत यांनी सामना रोखठोकमध्ये केला आहे.

राऊतांच्या दाव्यानुसार पवार म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण 'पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील, असे पवार-ठाकरे यांचे मत पडले,असा दावा राऊतांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com