Pankaja Munde : "मोदीही मला संपवू शकणार नाहीत"; पंकजा मुंडेंचा व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde_Narendra Modi

Pankaja Munde : "मोदीही मला संपवू शकणार नाहीत"; पंकजा मुंडेंचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मी वंशवादाचं प्रतिक असून मला पंतप्रधान मोदीही संपवू शकत नाहीत, असं खळबळजनक विधान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलत असताना व्यासपीठावरुन त्यांनी हे विधान केल. त्यांच्या या विधानामुळं आता चर्चेला तोंड फुटलं आहे. (Even PM Modi will not be able to finish me Pankaja Munde video goes viral)

"मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी देखील वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कोणी संपवू शकणार नाही. मोदीजी पण, जर तुमच्या मनात मी राज्य केलं असेल तर. तुमच्यामुळं जर मी काही चांगलं करु शकले तर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला राजकारणात स्वच्छता आणायची आहे," असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. कारण फडणवीस सरकार गेल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर भाजपनं पाठवलं नाही. तसेच आता महाविकास आघाडीचं सरकार जेऊन शिंदे-फडणवीसांचं सरकार सत्तेत असतानाही त्यांना डावलण्यात आल्यानं त्या नाराज आहेत. पण भाजपनं त्यांना पक्षांतर्गत मोठी जबाबदारी सोपवली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवरच त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ पंकजा मुंडे देखील राष्ट्रवादीत दाखल होतील की काय अशा चर्चाही मध्यंतरी रंगल्या होत्या.