CM शिंदेंनी PM मोदींना भेट दिलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचा दोन महिन्यात लिलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

every year on modis birthday the gifts he received are auctioned

CM शिंदेंनी PM मोदींना भेट दिलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचा दोन महिन्यात लिलाव

शिवसेनेचे कट्टर नेते असणारे एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांनी भेटवस्तू म्हणून विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती दिली होती. दरम्यान, या मुर्तीचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोन महिन्यात मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेल्या भेटीचा लिलाव करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (every year on modis birthday the gifts he received are auctioned )

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वर्षभराच्या काळात त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होतो आणि ती रक्कम नमामि गंगा प्रकल्पासाठी दिली जाते. या लिलाव झालेल्या तब्बल 1200 वस्तूंमध्ये या मूर्तीचाही समावेश आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मुर्तीचादेखील समावेश आहे.

दिल्लीतील मॉडर्न आर्ट गॅलरीमध्ये या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले असून या मूर्तीसाठी बोली सुरु करण्याची किंमत 10 हजार 800 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 8 आणि 9 जुलै रोजी दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा अशा सर्व वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व नेत्यांना विठ्ठल - रुक्मिणीची मूर्ती भेट म्हणून दिली होती.

आता पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या मूर्तीचा अवघ्या दोन महिन्यांमध्येच लिलाव करण्यात आला आहे. याशिवाय 7 मार्च रोजी तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या कोल्हापुरच्या अंबाबाईच्या मूर्तीचाही लिलाव करण्यात आला आहे.

Web Title: Every Year On Modis Birthday The Gifts He Received Are Auctioned

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..