
सोलापूर ः देशात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊनमध्ये जवळपास दोन-तीन महिन्यांचा कालावधी गेला. या कालावधीत सगळेच उद्योग-धंदे बंद राहिले. त्याचा सकारात्मक परिणाम हवामानावर झाला आहे. या लॉकडाऊनमुळेच यंदाच्या वर्षी पाऊस वेळेवर आला. त्यामुळे दरवर्षीच एक-दोन महिने लॉकडाऊन असावा अशी चर्चा ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या शेतकरी वर्गामधून सुरु आहे.
देशात शेतीवर मोठ्या प्रमाणात लोकसंख्या अवलंबून आहे. अनेक लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. ती शेती चांगली पिकायची असेल तर त्यासाठी पाऊस वेळेवर पडणे गरजेचे आहे. पाऊस वेळेवर पडला तर चांगल्या प्रकारचे उत्पादन घेण्यात शेतकरी यशस्वी होतात. मागील वर्षी झालेला पाऊस हा बेभरवाशाचा पाऊस होता. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. पण, जे पावसाचे महिने असतात ते मात्र कोरडेच गेले. त्याचा परिणाम खरीप व रब्बी या दोन्ही हंगामावर झाला.
यंदाच्या वर्षी कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे सर्व उद्योग-धंदे बंद ठेवण्यात आले. त्यामुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात घट झाली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची वाहने बंद ठेवण्यात आली. त्यामुळेही प्रदुषणात मोठ्या प्रमाणात घट झाली. प्रदुषणात मोठ्या प्रमाणात झालेली घट ही हवामानासाठी पोषक ठरली. प्रदुषण घटल्यामुळेच यंदाच्या वर्षी अगदी वेळेवर पावसाचे आगमन झाल्याची चर्चा बळीराजामध्ये सुरु आहे. जिल्ह्यात 10 जूनला सर्वदूर मोठा पाऊस झाला. त्या पावसाने यंदाच्या पावसाळ्याची झलक दाखवून दिल्याची चर्चाही शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे. मागील वर्षी 500 मीटर अंतरावर पाऊस तर पुढील 500 मीटरवर कोरडेठाक असल्याचे दृष्य पाहायला मिळाले होते. मात्र, यंदाच्या वर्षी झालेला पाऊस हा सगळीकडे झाला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निसर्गाने केलेल्या या कामगिरीमध्ये मृग नक्षत्राची सुरवात चांगली झाली आहे. जिल्ह्यात पेरणीसाठी आवश्यक असलेली स्थिती निर्माण झाली आहे. बळीराजा आता पेरणीच्या लगबगीमध्ये आहे. हे जरी खरे असले तरी ही सारी किमया लॉकडाऊनने दाखवून दिली असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे वर्षातील एक-दोन महिने अशाच प्रकारचा लॉकडाऊन असायला हवा अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.