Jayant Prabhakar Patil : महिनाभरात दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी ; ‘शेकाप’चे माजी आमदार जयंत पाटील यांचा पंढरपूरमध्ये गौप्यस्फोट

‘‘एक महिन्यामध्ये केंद्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे दिल्लीत आहेत,’’
Jayant Prabhakar Patil
Jayant Prabhakar Patilsakal
Updated on

पंढरपूर : ‘‘एक महिन्यामध्ये केंद्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे दिल्लीत आहेत,’’ असा मोठा राजकीय गौप्यस्फोट शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयंत पाटील यांनी आज येथे केला. ‘शेकाप’चे १९ वे राज्यस्तरीय अधिवेशन आजपासून पंढरपुरात सुरू झाले. या अधिवेशनाच्या उद्‌घाटनाला शुक्रवारी (ता.२) राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार येणार होते. परंतु अचानक दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आल्याने पवार दिल्लीला गेल्याचेही पाटील यांनी सांगितले. अधिवेशनाचे उद्‌घाटन भाकपचे (मार्क्सवादी लेनिनवादी) नेते दीपांकर भट्टाचार्य यांच्या हस्ते झाले. उदघाटनाच्या भाषणात जयंत पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीतील पराभवावर भाष्य करत काँग्रेसवर निशाणा साधला.

यावेळी पाटील म्हणाले, की शेकापच्या नावावर अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठे झाले. पक्षाने त्यांना राजकीय ताकद दिली. राजकारणातील सत्तापदापर्यंत पोचवले. पण पक्षावर किंवा एखाद्या नेत्यावर अडचणीची वेळ येते, त्याचवेळी मात्र पक्षाचे नेते आणि पदाधिकारी साथ सोडून जातात, अलीकडे असे प्रकार वाढल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. त्यासाठी शेकापने मविआसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनाच्या उद्‌घाटनासाठी शरद पवार आज येणार होते. परंतु त्यांचा रात्री निरोप आला. दिल्लीत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. एक महिन्यात मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. त्यासाठी मला दिल्लीला थांबणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

जरांगे जे बोलतात ते करतील असे वाटत नाही

मनोज जरांगे पाटील जे बोलतात ते करतील असे वाटत नाही. आरक्षण मिळवणे हा त्यांचा उद्देश आहे. राजकारण करणे हा त्यांचा उद्देश नाही, असेही जयंत पाटील म्हणाले. जरांगे पाटील हे गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत. धनगर समाजालाही आरक्षण मिळावे, ही आमची मागणी आहे. केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवावी. शिवाय जातीय जनगणना करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com