सोलापूर शहर गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी! चोरीला गेलेला 325 जणांचा 3 कोटींचा ऐवज वर्षात केला परत; ‘या’ अधिकाऱ्यांची चोरट्यांनाही वाटते भीती, वाचा...

सोलापूर शहरातील घरफोडी, जबरी चोरीसह वाहन चोरीच्या ३२५ गुन्ह्यांची उकल गुन्हे शाखेच्या पथकांनी एका वर्षात केली आहे. त्यात सात दिवसा घरफोड्या, रात्रीच्या ४४ घरफोड्या, १४ जबरी चोरी, चोरीला गेलेल्या १६१ दुचाकी व दोन चारचाकीसह इतर ९७ चोरीचे गुन्हे आहेत. पोलिसांनी केवळ चोरट्यांना शोधलेच नाही तर त्यांच्याकडून तब्बल तीन कोटी रुपयांचा ऐवज देखील हस्तगत केला.
solapur city police

solapur city police

sakal

Updated on

सोलापूर : सोलापूर शहरातील घरफोडी, जबरी चोरीसह वाहन चोरीच्या ३२५ गुन्ह्यांची उकल गुन्हे शाखेच्या पथकांनी एका वर्षात केली आहे. त्यात सात दिवसा घरफोड्या, रात्रीच्या ४४ घरफोड्या, १४ जबरी चोरी, चोरीला गेलेल्या १६१ दुचाकी व दोन चारचाकीसह इतर ९७ चोरीचे गुन्हे आहेत. पोलिसांनी केवळ चोरट्यांना शोधलेच नाही तर त्यांच्याकडून तब्बल तीन कोटी रुपयांचा ऐवज देखील हस्तगत केला.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात सोलापूर शहर गुन्हे शाखेने कौतूकास्पद कामगिरी करीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तडीपार करुनही शहरात फिरणाऱ्या १६ जणांना पकडले. विविध गुन्ह्यातील ४२ वॉन्टेड (पाहिजेत) आरोपींनाही पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. एमडी ड्रग्ज, गांजा जवळ बाळगणाऱ्यांनाही गुन्हे शाखेच्याच पथकाने जेरबंद केले. सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुर्गी नाला परिसरातील एका तृतीयपंथीचा खून करणाऱ्या तिघांना अवघ्या सहा तासातच गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले होते.

शहरातील २५ सराईत गुन्हेगारांना ‘एमपीडीए’च्या माध्यमातून येरवडा कारागृहात पाठविण्यातही शहर गुन्हे शाखेची मदत झाली आहे. दरम्यान, सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत दाखल गुन्ह्यापैकी ९५ टक्के गुन्ह्यांचा छडा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे. २०१९ ते २०२४ या सहा वर्षांच्या तुलनेत २०२५ मधील शहर गुन्हे शाखेची कामगिरी कौतूकास्पद ठरली आहे. चोरट्यांनी चोरलेला दोन कोटी ९९ लाख ३६ हजार ९४९ रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत करून तो संबंधित फिर्यादस परत देखील दिला आहे.

गुन्हे शाखेची सहा पथके

सोलापूर शहरात पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके कार्यरत आहेत. पथकांचे सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम घाडगे, विजय पाटील, निलेश सोनवणे पाटील, शंकर धायगुडे, दत्तात्रय काळे व शैलेश खेडकर यांच्याकडे आहे. यात पोलिस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, शामकांत जाधव यांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com