भारत-रशियाच्या युद्धनौकांची कवायत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exercise of Indo Russian warships
भारत-रशियाच्या युद्धनौकांची कवायत

भारत-रशियाच्या युद्धनौकांची कवायत

मुंबई : भारत(India) व रशिया (Russia)यांच्या नौदलातील युद्धनौकांनी शुक्रवारी (ता. 14) अरबी समुद्रात (Arabian Sea) कवायती व युद्धसराव केला.भारताची स्वदेशी बनावटीची व रडारवर न दिसणारी विनाशिका आयएनएस कोची (INS Kochi) व रशियन महासंघाच्या नौदलाची विनाशिका आरएफएस ट्रिब्यूट्स यांनी भरसमुद्रात कवायती केल्या. शत्रूविरुद्ध संयुक्त कारवाया करताना परस्पर समन्वय साधणे व एकत्रित कृतीचा मेळ घालण्यासाठी हा सराव होता.

हेही वाचा: Pune : मोबाईलवर एका क्लिकमध्ये मिळवा कोरोना रिपोर्ट

यावेळी विशिष्ठ प्रकारे मार्गक्रमण, एकमेकांच्या युद्धनौकांच्या डेकवर आपली हेलिकॉप्टर उतरवणे तसेच समुद्रातील अन्य युद्धसराव आणि हालचाली यांची उजळणीही यावेळी करण्यात आली. ही माहिती नौदलाच्या पश्चिम विभागाच्या प्रवक्त्याने दिली आहे.

के. पी. अरविंदन यांची नियुक्ती

रिअर अॅडमिरल के. पी. अरविंदन यांनी मुंबईच्या नौदल गोदीचे अॅडमिरल सुपरिंटेंडंट म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांनी शुक्रवारी रिअर अॅडमिरल बी. शिवकुमार यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. अरविंदन हे लोणावळ्याच्या आयएनएस शिवाजी नौदल अभियांत्रिकी महाविद्यालाचे पदवीधर आहेत. 1987 मध्ये नौदलात दाखल झाल्यावर आतापर्यंत त्यांनी 34 वर्षे सेवा केली आहे. या कालावधीत त्यांनी विभागीय मुख्यालय, प्रशिक्षण संस्था तसेच नौदल गोदीत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका कृपाण, क्षेपणास्त्रधारी विनाशिका राजपूत व रणजीत यांच्यावरही काम केले आहे. आयएनएस शिवाजीचे मुख्याधिकारी म्हणूनही ते कार्यरत होते. कारवारच्या नौदल दुरुस्ती गोदीचे अॅडमिरल सुपरिंटेंडंट म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांना यापूर्वी विशिष्ठ सेवा पदकाने गौरविण्यात आले आहे.

Web Title: Exercise Of Indo Russian Warships

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..