
मुंबई : कोरोनाच्या लसीची घाईघाईत केंद्र सरकारकडून केली जाणारी घोषणा म्हणजे मोदींना लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करण्यासाठीचा हा आटापीटा आहे का?," असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
जगभरासह भारतात कोरोनावरील लसीवर संशोधन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता भारतीय बनावटीची पहिली लस कॅव्हसिन ही येत्या स्वातंत्र्यदिनी बाजारात येण्याची शक्यता भारतीय वैद्यकिय संशोधन मंडळाद्वारे (आयसीएमआर) वर्तवण्यात आली आहे. मात्र, या लसीच्या क्लिनीकल चाचण्या, अन्य वैद्यकिय संशोधन याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. यावरुन माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. "मोदींना लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करण्यासाठीच हा आटापीटा आहे का?," असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भारत बायोटेक कंपनी व आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली जात आहे. या लसीबाबत अद्याप प्रयोग सुरू आहेत.
कोरोनावरील लस 15 ऑगस्टपर्यंत तयार होईल, हा आयसीएमआरचा दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी, यासाठी हा आटापीटा आहे का? आरोग्य मंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले पाहीजे.
- पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेस नेते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.