पश्चिम रेल्वेच्या सहा विशेष रेल्वे गाड्या मुदतवाढ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

western railway

प्रवाशाची अतिरिक गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने सहा विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहेत.

Western Railway : पश्चिम रेल्वेच्या सहा विशेष रेल्वे गाड्या मुदतवाढ!

मुंबई - प्रवाशाची अतिरिक गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने सहा विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहेत. या गाड्या अहमदाबाद ते आग्रा आणि अहमदाबाद ते कानपूर दरम्यान धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 01906 अहमदाबाद - कानपूर सेंट्रल सुपरफास्ट स्पेशलची वारंवारता 3 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 01905 कानपूर सेंट्रल - अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशलची वारंवारता 2 जानेवारी ते 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक 04166 अहमदाबाद - आग्रा कॅंट सुपरफास्ट स्पेशलची वारंवारता 5 जानेवारी ते 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 04165 आग्रा कॅंट - अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल 4 जानेवारी ते 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक 04168 अहमदाबाद - आग्रा कॅंट सुपरफास्ट स्पेशलची वारंवारता 2 जानेवारी ते 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 04167 आग्रा कॅंट - अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशलची वारंवारता 1 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मुदत वाढविलेल्या विशेष ट्रेनचा फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह आरक्षण 24 डिसेंबर 2022 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

टॅग्स :ExtensionWestern Railway