
पुणे : ‘‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनेक प्रकारचे उपचार रुग्णांवर होतात. त्यामुळे सर्व चूक रुग्णालयाची आहे, असे म्हणू शकत नाही. मात्र, या केसमध्ये नक्कीच त्यांनी असंवेदनशीलपणा दाखवला आहे. ज्या ठिकाणी चूक आहे, तिथे चूक म्हणावे लागेल,’’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच, धर्मादायमधील सर्व व्यवस्था ऑनलाइन प्रणालीद्वारे एकाच व्यासपीठावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही फडणवीस म्हणाले.