esakal | मंत्री थोरात यांच्या मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट, लोकांकडे फोन-पेद्वारे पैशाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Fake Facebook account in the name of Minister Thorat's daughter

मंत्री थोरात यांच्या मुलीच्या नावे हॅकर लोकांची फसवणूक करीत आहेत. याबद्दल थोरात यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

मंत्री थोरात यांच्या मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट, लोकांकडे फोन-पेद्वारे पैशाची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर ः सोशल मीडियाच्या माध्यमातून हॅकर सर्वसामान्य माणसाला गंडा घालतात. त्यांच्या बँक खात्यावरही ते डल्ला मारतात. परंतु आता या हॅकर्सने राजकीय पदाधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने बनावट अकाउंड बनवून गोरखधंदा सुरू केला आहे.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नातेवाईकांनाही याचा फटका बसला आहे. संगमनेर पोलिस ठाण्यात त्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.

मंत्री थोरात यांची कन्या डॉ. जयश्री यांच्या नावाने कोणीतरी बनावट फेसबुक अकाउंट उघडले आहे. त्याचा आधार घेत फोन पे आणि गुगल पे द्वारे पैसे मागितले जात आहेत.

ही बाब थोरात यांच्या यंत्रणेच्या निदर्शनास आली. लोकांची फसवणूक टाळली जावी, यासाठी त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. सिद्धार्थ सुभाष थोरात यांनी संगमनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. बनावट फेसबुक खाते बंद करून संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशा आशयाची त्यांची तक्रार आहे.

थोरात यांनी तक्रार करताना हॅकरने लोकांना पैशाची मागणी केलेले  स्क्रीन शॉट पाठवले आहेत. जर कोणाला अशा प्रकारे पैशाची मागणी होत असेल तर कोणीही पैसे देऊ नयेत, असे आवाहनही थोरात यांच्या यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे. फेसबुक अकाउंटवर हॅकरने मंत्री थोरात यांच्या पत्नी व मुलगी डॉ. जयश्री यांचा फोटो वापरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. 

loading image