Maharashtra Farmers: पेरलं, पण उगवलंच नाही! बोगस सोयाबीन बियाण्यांनी हजारो शेतकरी अडचणीत

Thousands of Farmers Report Poor Soybean Germination: सोयाबीन उगवण, कृषी विभाग आणि बोगस बियाणे प्रकरणात राज्यभरात कारवाई सुरू असून कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Maharashtra Farmers

Maharashtra Farmers

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर-नागपूर: मराठवाडा आणि विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक भागांमध्ये पेरणी केल्यानंतर सोयाबीनची उगवणच झाली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली. आतापर्यंत कृषी विभागाकडे तीन हजार ६१५ तक्रारी आल्या असून, प्रयोगशाळांकडे पाठविण्यात आलेले ५८१ नमुने अप्रमाणित निघाले आहेत. ‘ॲक्शन मोड’वर आलेल्या कृषी विभागाने चार ठिकाणी बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. कृषी विभागाने उद्या (ता. १५) याबाबत बैठक बोलाविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com