कळंब - कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ तसेच पीक विमा व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी फार्मर आयडी योजना राबविण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे.