शेतकरी पुन्हा काढणार ‘किसान लाँग मार्च’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली. 

शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता जबाबदारीतून पळ काढत आहे, परिणामी पाणी, चाराटंचाई, वाढते कर्ज यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढत आहेत. कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्यात, जनावरांना दावणीवर चारा द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान द्यावे आदी मागण्या घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरणार आहेत.

राज्यभरातील शेतकऱ्यांना बोंड अळीचे अनुदान जाहीर केले; मात्र अजूनही शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. पंतप्रधान पीकविमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ही योजना शेतकऱ्यांसाठी नाही तर विमा कंपन्यासाठी सुरू केल्याचे ॲड. भोजने यांनी नमूद केले. 

Web Title: Farmer Kisan Long march