esakal | शेतकऱ्यांना करता येणार पिकांची ऍपद्वारे नोंद 
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांना करता येणार पिकांची ऍपद्वारे नोंद 

ई पीक पाहणी या कार्यक्रमांतर्गत पेरलेल्या पिकांची नोंद मोबाईल ऍपद्वारे शेतकरी स्वत: करू शकतात.यासाठी शेतकऱ्यांना गुगल प्ले स्टोअरवरून "ईपीकपाणी' हे ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे

शेतकऱ्यांना करता येणार पिकांची ऍपद्वारे नोंद 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - शेतामध्ये पेरलेल्या पिकांची नोंद शेतकऱ्यांना स्वतः मोबाईल ऍपद्वारे करता येणार आहे. पिकांची नोंद झालेल्या क्षेत्राची अचूक माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना पीक विमा योजना आणि कृषी पत पुरवठ्यासाठी लाभ होणार आहे. 

ई पीक पाहणी या कार्यक्रमांतर्गत पेरलेल्या पिकांची नोंद मोबाईल ऍपद्वारे शेतकरी स्वत: करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना गुगल प्ले स्टोअरवरून "ईपीकपाणी' हे ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामती तालुक्‍यात पथदर्शी प्रकल्प 
राज्य सरकार आणि टाटा ट्रस्टच्या वतीने बारामती तालुक्‍यामध्ये ई पीक पाहणी हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासंदर्भातील कार्यशाळा झूम कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रकल्प प्रमुख आणि माजी मुख्य सचिव जयंत बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये विभागीय कार्यालयातील उपायुक्त प्रताप जाधव, ई फेरफार राज्य समन्वयक रामदास जगताप, प्रकल्प राज्य समन्वयक संभाजी कडू पाटील, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ, सर्व मंडळ अधिकारी, पर्यवेक्षक, तलाठी आणि कृषी सहायक यांनी सहभाग घेतला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


अडचण आल्यास संपर्क : 
ई पीक पाहणी ऍपचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वत: वापर करावा. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा समन्वयक विनोद परकाळे (9764258244) यांच्याशी संपर्क साधावा.