Mahavitaran
Mahavitaranesakal

Electricity: वापर वीतभर बिल हाथभर ; शेतकऱ्यांला आले १ लाख २९ हजाराचे विज-बिल

वाडा तालुक्यातील म्हसरोली येथील शेतकऱ्याने वीज चोरी केल्याच्या संशयातून एक लाख ३० हजारांचे देयक महावितरणकडून पाठवण्यात आले आहे. मात्र शेतकऱ्याने कोणतीही वीज चोरी न केल्याचा दावा करत कंपनीच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे.

म्हसरोली येथील अजित वामन पाटील यांनी वीज चोरी केल्याच्या आरोपातून एक लाख २९ हजारांचे वीज देयक आकारण्यात आले आहे. वीज वाहिनीवरून कोणत्याही प्रकारे वीज चोरी केली नाही अथवा वीज वाहिन्यांसोबत कोणतीही छेडछाड केली नाही.

Mahavitaran
Nashik Electricity Problem: ऐन दिवाळीत पंचवटी परिसरात विजेचा लपंडाव; नागरिक हवालदिल

अंगणात असलेल्या वायरचे फोटो काढून चुकीचे देयक आकारत कारवाई करण्यात आली. आपले कुटुंब हे शेतकरी असल्याने उदरनिर्वाह शेतीच्या उत्पन्नावर चालतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणातील देयक मी भरू शकत नाही.

शेतीतून मिळणारे उत्पन्न अल्प असल्याने वाढीव देयकाबाबत माझे कुटुंब मानसिक तणावाखाली असल्याचे शेतकरी पाटील यांनी सांगितले. याबाबत त्यांनी वाडा कार्यालयातील उप अभियंता यांना निवेदन देत कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

Mahavitaran
Electric Blanket : यंदाच्या हिवाळ्यात थंडीला करा रामराम, ही इलेक्ट्रिक रजाई देईल उबदार आराम; किंमतही अगदी कमी

वीजचोरी केली नसताना महावितरणने चुकीचे देयक पाठवले आहे. माझे उत्पन्न शेतीवर आधारित असल्याने वीज देयक भरू शकत नसल्याचे व महावितरणने चुकीची कारवाई केल्याबाबत कंपनीला निवेदन देऊन कळवले आहे.

- अजित वामन पाटील, ग्राहक, म्हसरोली

संबंधित शेतकऱ्याला आलेल्या वीज देयकाची शहानिशा करून मगच त्यावर तोडगा काढता येईल.

- अविनाश कटकवार, उप कार्यकारी अभियंता, महावितरण, वाडा

Mahavitaran
Electric Bike : धावत्या इलेक्ट्रीक बाईकने घेतला पेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com