राज्यातील ४० दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनाच ‘इतक्या’ हजारांची मदत! वाढीव मंडळांना फक्त ८ सवलती, आर्थिक मदत नाहीच

मंत्रिमंडळाच्या उपसमितीने १०२१ महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर केला. मात्र, वाढीव मंडळातील शेतकऱ्यांना केवळ सवलती मिळणार असून आर्थिक मदत परवडणारी नसल्याने ४० तालुक्यातील शेतकऱ्यांनाच अर्थसहाय मिळेल, असे मदत व पुनवर्सन विभागातील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.
Mantralay
Mantralayesakal

सोलापूर : पावसाळ्यात सरासरीपेक्षा ५० ते ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला. या पार्श्वभूमीवर ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या उपसमितीने १०२१ महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर केला. मात्र, वाढीव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना केवळ सवलतीच मिळणार असून आर्थिक मदत परवडणारी नसल्याने त्या ४० तालुक्यातील शेतकऱ्यांनाच अर्थसहाय मिळेल, असे मदत व पुनवर्सन विभागातील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

राज्यातील १० जिल्ह्यांमधील ३५५ गावे आणि ९५९ वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी ३७७ टॅंकर सुरु झाले आहेत. धरणे व मध्यम- लघू प्रकल्प साठ्यातील पाणीसाठी देखील झपाट्याने कमी होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जाणवू लागला आहे. पावसाअभावी खरीप वाया गेला, परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत ओल नसल्याने रब्बीच्या पेरण्याही कमीच झाल्याची वस्तुस्थिती आहे. सॅटेलाईट सर्व्हेत राज्यातील काही तालुक्यांमध्येच दुष्काळी स्थिती असल्याचे नमूद झाले. परंतु, राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत एक हजार २१ महसूल मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर झाला.

मात्र, ४० तालुक्यांनाच दुष्काळी सवलतीसह आर्थिक मदत मिळणार आहे. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव येतील. त्यानंतर तेथून संबंधित ४० तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या मदतीचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत मदत वितरीत करण्याचा निर्णय अपेक्षित आहे. पण, मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यास वाढलेल्या महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळू शकते, असेही सूत्रांनी सांगितले.

‘एसडीआरएफ’अंतर्गत राज्य सरकारने सात हजार कोटींची तरतूद यापूर्वीच केली असून त्यातून ही मदत वितरीत होईल. मदतीसाठी केंद्र सरकारकडेही ‘एनडीआरएफ’मधून मदत मागणीचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

दुष्काळग्रस्तांसाठी ‘या’ ८ सवलती

  • - शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट

  • - शेतकऱ्यांकडील पीक कर्जाचे पुनर्गठन

  • - शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती

  • - कृषीपंपाच्या चालू विजबिलाबात ३३.५ टक्के सूट

  • - शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी

  • - रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता

  • - आवश्यक त्या गावांना पिण्याचे पाणी टँकरने पुरवणे

  • - ‘महावितरण’ने शेतीपंपाची वीज जोडणी खंडीत करू नये

दुष्काळग्रस्तांना हेक्टरी मदत

  • जिरायत

  • ८,५००

  • बागायती

  • १७,०००

  • बहुवार्षिक

  • २२,५००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com