शेतकऱ्यांचा अपमान विसरणार नाही; काँग्रेसच्या नसीम खान यांची टीका | Naseem Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naseem khan

शेतकऱ्यांचा अपमान विसरणार नाही; काँग्रेसच्या नसीम खान यांची टीका

मुंबई : कृषी कायदे (farmers law) मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर (Delhi border) आंदोलन (farmers strike) करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही, खलिस्तानी, नक्षलवादी (Naxalite) संबोधण्यात आले. त्यांचा हा अपमान देशातील जनता कधीही विसरणार नाही, अशी टीका राज्य काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान (Naseem khan) यांनी आज येथे केली.

हेही वाचा: NCB विरोधात काय म्हणालं हायकोर्ट? आर्यनच्या जामीन आदेशातील दहा प्रमुख मुद्दे

कृषी कायदे मागे घेतल्यानंतर प्रदेश काँग्रेसने आज राज्यभर तसेच मुंबईतही ‘किसान विजय दिवस’ साजरा केला. पंतप्रधानांनी कायदे मागे घेत असल्याचे जाहीर करुनही जोपर्यंत संसदेत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकरी त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीच. पंतप्रधानांनी शेतकरी व जनतेचा विश्वास गमावल्याचेच हे द्योतक आहे, असेही खान यांनी टिळक भवन येथील कार्यक्रमात सांगितले.

पहिल्या दिवसापासून राहुल गांधी यांनी, हे कायदे सरकारला मागे घ्यावे लागतील अशी परखड भूमिका मांडली होती. राहुल गांधी यांचे आधीच ऐकले असते तर सातशे शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला नसता, असेही खान यांनी दाखवून दिले. नोटबंदी, कृषीकायदे आदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले सर्व निर्णय देशाला खड्यात घालणारे निघाले. भाजपाचा हा अहंकार देशातील जनतेच्या मुळावर उठला असून त्यात नुकसान जनतेचे होत आहे, असाही आरोप नसीम खान यांनी केला.

loading image
go to top