पुणे - राज्यात मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वीच मॉन्सूपूर्व पावसामुळे ३२ हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. दुसरीकडे मॉन्सूनचा पाऊस राज्यात दाखल झाला असून ४२५ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. मॉन्सूनची वाटचाल पुढे मंदावण्याची शक्यता व्यक्त करीत पेरण्यांची घाई न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. अशा घडामोडींमुळे खरिपापूर्वीच बळीराजा संकटात सापडला आहे.
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, मॉन्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी व बागायती पिकांचे झालेले नुकसान २३ मेपर्यंत ३२ हजार हेक्टरच्या आसपास पोहोचले आहे.