
Fasttag Recharge Tips : FastTag चा रिचार्ज करण्यापूर्वी जाणून घ्या या 3 गोष्टी, नाही तर करावा लागेल पश्चात्ताप
Fastag Recharge Tips : जर तुम्ही कार चालवत असाल तर तुमच्याकडे फास्टॅग असणं गरजेचं आहे. आणि जर तुमचं शहराबाहेर येणंजाणं असेल तर तुम्ही फास्टॅग रिचार्ज केलाच पाहिजे. पण फास्टॅग रिचार्ज करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, नाहीतर एखाद्या छोट्याश्या चुकीमुळे तुम्हाला मोठा भुर्दंड बसू शकतो. कोणत्याही प्रकारचे नुकसान आणि फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
फास्टॅग रिचार्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा...
योग्य बँकेचं नाव निवडा
बरेच लोक फास्टॅग रिचार्ज करताना बँकेचे नाव टाकताना गल्लत करतात, ज्यामुळे त्यांना अडचणी येतात. अशा स्थितीत रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे कोणत्या बँकेचा फास्टॅग उपलब्ध आहे याची खात्री करून घ्यावी. जर तुम्ही तुमचा फास्टॅग रिचार्ज करताना चुकीच्या बँकेचे नाव निवडले तर तुमच्या अकाऊंट मधून पैसे कट होतील आणि तुमचा रिचार्जही होणार नाही. अशी परिस्थिती ओढावली की लोक Google वर कस्टमर केअर नंबर शोधू लागतात आणि चुकीचा नंबर मिळाल्यावर अनेक लोक फसवणुकीला बळी पडतात.
वाहन क्रमांकाकडेही लक्ष द्या...
फास्टॅग रिचार्ज करताना, रिचार्जच्या दुसऱ्या टप्प्यावर वाहन क्रमांक टाकताना काळजी घ्या. जर तुम्ही रिचार्ज करताना चुकीचा नंबर टाकला असेल तर तुमच्या बँक खात्यातून किंवा कार्डमधून पैसे कापले जातील आणि तुमचे रिचार्ज होणार नाही.
डिटेल्स व्हेरिफाई करा आणि त्यानंतरच पेमेंट करा
बँक डिटेल्स आणि वाहन क्रमांकाशी संबंधित डिटेल्स चेक केल्यानंतर, तुम्हाला पुढील टप्प्यात पेमेंट करावे लागेल. पेमेंट करण्यासाठी तुम्ही कार्ड किंवा UPI द्वारे पेमेंट करू शकता. पेमेंट करताना योग्य कार्ड नंबर आणि UPI पिन टाका. नाहीतर तुमचा फास्टॅग रिचार्ज मध्येच अडकू शकतो.