धक्‍कादायक! वडिल वॉचमन होते अन्‌ मुलाने केला वैयक्‍तिक संबंधातून शेजारील महिलेचा खून 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

शेजारील अर्पाटमेंटमध्येच 'त्याचे' वडील होते वॉचमन 
खून झालेली महिला मोहिते नगरात स्वत:च्या बंगल्यात राहायला होती. या बंगल्याशेजारी एक अर्पाटमेंट असून त्याठिकाणी आरोपी सैफअली शेख याचे वडिल वॉचमन म्हणून काम करत आहेत. वडिलांकडे ये-जा करत असतानाच आरोपीची नागदेवी यांच्याशी ओळख झाली. त्यातून त्यांच्यात वैयक्‍तिक संबंध आले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. आरोपी हा बांधकामाची कामे करतो, असेही पोलिसांनी सांगितले. 

सोलापूर : होटगी रोडवरील कैकशा अर्पाटमेंट येथे राहणाऱ्या नागदेवी या महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खून झालेल्या महिलेचा भाऊ विजयकुमार स्वामी यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिस बंगल्यातील सीसीटिव्हीचा आधार घेत आरोपीपर्यंत पोहचले. वैयक्‍तिक संबंधातून की अनैतिक संबंधातून आरोपीने हा खून केला, याचा तपास पोलिस करीत आहेत. 

कैकशा अर्पाटमेंटजवळील एका बंगल्यात नागदेवी या राहत होत्या. 29 व 30 जून रोजी त्यांचा भाऊ विजयकुमार गुरुपादप्पा स्वामी (रा. विल्डवेज, बाणेर, पुणे) यांनी फोन केला. मात्र, नागदेवी यांचे दोन्ही नंबर स्वीच ऑफ लागले. त्यानंतर विजयकुमार यांनी त्यांच्या बहिणीस हा प्रकार सांगितला आणि बहिणीचा मुलगा त्याठिकाणी पोहचला. त्यावेळी गेट बंद होते, तर मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरुममध्ये नागदेवी मृतावस्थेत पडलेल्या दिसून आल्या. हा प्रकार पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी बंगल्यातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एक तरुण वॉल कंपाउंडवरुन लपत-लपत बंगल्यात आल्याचे दिसले. तो मागील दरवाजातून आत जाण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र दरवाजा न उघडल्याने तो मुख्य दरवाजातून घरात गेला. काहीवेळाने तो बाहेर आल्याचेही पोलिसांना सीसीटिव्हीतून दिसून आले. याआधारे पोलिसांनी आरोपी सैफअली अशरफ शेख याला कलबुर्गी येथील त्याच्या सासरवाडीतून ताब्यात घेतले. आता नेमका हा खून वैयक्‍तिक संबंधातून की अनैतिक संबंधातून झाला, याचा तपास पोलिस निरीक्षक श्री. शेडगे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. 

शेजारील अर्पाटमेंटमध्येच 'त्याचे' वडील होते वॉचमन 
खून झालेली महिला मोहिते नगरात स्वत:च्या बंगल्यात राहायला होती. या बंगल्याशेजारी एक अर्पाटमेंट असून त्याठिकाणी आरोपी सैफअली शेख याचे वडिल वॉचमन म्हणून काम करत आहेत. वडिलांकडे ये-जा करत असतानाच आरोपीची नागदेवी यांच्याशी ओळख झाली. त्यातून त्यांच्यात वैयक्‍तिक संबंध आले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. आरोपी हा बांधकामाची कामे करतो, असेही पोलिसांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The father was a Watchman and the son murdered a woman next door in a personal relationship