बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

समाजमन हादरवून टाकणारी आणि वडील-मुलीच्या पवित्र नात्यालाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना माढा तालुक्यात उघडकीस आली आहे. एका गावात नराधम बापानेच आपल्या अल्पवयीन लेकीवर वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून, मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा घृणास्पद प्रकार उघड झाला.
Solapur Crime News

Solapur Crime News

esakal
Updated on

उपळाई बुद्रूक : समाजमन हादरवून टाकणारी आणि वडील-मुलीच्या पवित्र नात्यालाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना माढा तालुक्यात उघडकीस आली आहे. एका गावात नराधम बापानेच आपल्या अल्पवयीन लेकीवर वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून, मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा घृणास्पद प्रकार उघड झाला. या प्रकरणी माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी अवघी १७ वर्षांची असून ती अल्पवयीन आहे. गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून तिच्यावर तिच्याच वडिलांकडून अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घरातील व्यक्तीकडूनच अत्याचार होत असल्याने आणि भीतीपोटी मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्यामुळे ही बालिका दीर्घकाळ मानसिक व शारीरिक छळ सहन करत होती.

आजारी पडल्यावर दवाखान्यात गेल्यावर हा सगळा प्रकार उजेडात आला. या घटनेनंतर माढा पोलिस ठाण्यात संशयित आरोपी बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

डॉक्टरांनी तपासल्यानंतर प्रकरण उघडकीस

काही दिवसांपूर्वी मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डॉक्टरांना संशय आला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com