Video : दानपेटीत टाकलं स्त्री अर्भक; निर्दयी मातेला 'ती' नकोशी होती, पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

infant india beed

Video : दानपेटीत टाकलं स्त्री अर्भक; निर्दयी मातेला 'ती' नकोशी होती, पण...

बीडः बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक स्त्री जातीचं अर्भक सामाजिक संस्थेच्या दानपेटीजवळ टाकून मातेने पोबारा केला. संस्थेचे संचालक वेळीच तिथे पोहोचले नसता अनर्थ झाला असता.

बीड शहरापासून जवळच असलेल्या पाली येथे इण्फंट इंडिया ही एचआयव्हीबाधितांसाठी काम करणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजाने नाकारलेल्या मुलांना सांभाळलं जातं, त्यांना शिक्षण दिलं जातं. दत्ता बारगजे आणि त्यांच्या पत्नी संध्या बारगजे हे दाम्पत्य ही संस्था चालवतात.

हेही वाचाः ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

काल (दि. १८) बारगजे दाम्पत्य मतदानासाठी गावी गेलं होतं. परतल्यानंतर त्यांना दानपेटीच्या जवळ हालचाल जाणवली. त्यांनी जवळ जावून पाहिलं असता धक्का बसला. एक नवजात अर्भक तिथे होतं.

दत्ता बागरजे आणि संध्या बारगजे यांनी तातडीने या चिमुकलीला जवळ घेतलं आणि तिला गोंजारलं, तिच्या प्रकृतीची तपासणी केली. यासंदर्भातला व्हीडिओ दत्ता बारगजे यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.

हेही वाचा: MPSC Recruitment : पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागात पदभरती; वाचा सविस्तर

अशा पद्धतीने बाळांना टाकून जावू नका, असं आवाहन बारगजे दाम्पत्याने केलं आहे. आमच्याशी संपर्क साधा, चाईल्ड लाईनशी संपर्क साधा नाव गोपनिय ठेवून मुलांना आसरा दिला जाईल, असं बारगजे म्हणाले.

या नकोशीला बीडच्या शिरुर तालुक्यातील आर्वी येथील दीपक नागरगोजे यांच्या शांतिवन प्रकल्पाकडे सुपूर्द करणार असल्याचं बारगजे यांनी सांगितंल.

बारगजे दाम्पत्याला हे अर्भक दिसलं नसतं अथवा त्यांना उशीर झाला असता तर या बाळाला श्वापदांपासून धोका निर्माण होऊ शकला असता. परंतु सुदैवाने ही चिमुकली सुखरुप होती.

टॅग्स :Beedcrime