
समर यूथ समिटचे ४ मे पासून पाचवे पर्व
मुंबई : सामाजिक स्वास्थ्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी तरुणांनी पुढे यावे, या विचारातून ‘यिन’चे ‘चला घडू देशासाठी’या यूथ समितीचे आयोजन ४ मे पासून राज्यात सुरू होत आहे. या ‘समिट’च्या माध्यमातून राज्यातील लाखो युवक एकत्रित येऊन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विचारविनिमय करणार आहे. ‘समिट’मध्ये सहभागी होण्यासाठी तरुणाई राज्यभरातून उत्साह दाखवत आहे.
‘यिन’ने राज्यात लाखोंचे संघटन उभे केले आहे. यामध्ये काम करणारी तरुणाई दरवर्षी अनेक उपक्रमांत काम करीत असते. या अनेक उपक्रमांमध्ये ‘समर यूथ समिट’हा उपक्रम महत्त्वाचा आहे. यात अनेक मान्यवर, त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा सहभागी तरुणाईसमोर ठेवणार आहेत. सेवा, आर्थिक साक्षरता, योग आणि ध्यानधारणा, उद्योजकता विकास, मानसिक आरोग्य, सकारात्मक विचार या विषयांवर तज्ज्ञ मान्यवर विशेष सत्र घेणार आहेत. राज्यातील सहा विभागांत ही समिट होणार आहे. अधिक माहितीसाठी ‘सकाळ'' कार्यालयाला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विभागवार तारखा
कोल्हापूर : ४ व ५ मे
पुणे : ९ व १० मे
नाशिक : १७ आणि १८ मे
औरंगाबाद : २१ आणि २२ मे
नागपूर : २७ आणि २८ मे
या उपक्रमात यावर्षी विशेष सहभागी होऊन तुम्हा सर्वांची साहाय्य करण्याची संधी महत्त्वाची वाटते. झपाट्याने बदलणाऱ्या आणि नवनव्या आव्हानांचा सामना करावा लागत असलेल्या आजच्या जगात समर्थपणे उभे राहता यावे यासाठी हा संयुक्त उपक्रम मोलाचा ठरेल, अशी आशा वाटते.
तुकाराम जाधव, संचालक, युनिक अॅकॅडमी, पुणे
औद्योगिक वसाहती, कुशल मनुष्यबळ यांची गरज ओळखून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टची स्थापना झाली. आम्ही ज्या प्रमाणे काम सुरू केले त्याच प्रमाणे ‘यिन’ने युवकांना दिशा देण्याचे काम केले. ‘समर युथ समेट’ उपक्रमास शुभेच्छा.
ज्ञानेश्वर लांडगे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे