
राज्यात सत्तांतर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतात. दरम्यान, एका जीममध्ये राजकीय वाद पेटला असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. राजकीय विषयांवरुन वाद अनेकवेळा आपण पाहिले आहेत. दरम्यान, कल्याणमध्ये राजकीय वादात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समर्थकांमध्ये हमरीतुमरी झाली. त्यांचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.(Fight cctv video in gym watch how bjp and ncp worker clashed)
आज सकाळी राष्ट्रवादीचे ब्रह्मा माळी हे जिममध्ये होते. यावेळी भाजपाचे पदाधिकारी कुंदन माळी हे आपल्या कार्यकर्त्यांसह जिममध्ये आले. जुन्या राजकीय वादातून कुंदन आणि ब्रह्मा यांच्यामध्ये वाद झाला. दोघांच्यात शाब्दीक चकमक रंगली. त्यांच्या या वादाचे रुपांतर हणामारीत झाले. तिघे जण मिळून एकाला मारहाण करताना व्हिडीओत दिसून आले आहेत. तर एक व्यक्ती या भांडणात मध्ये पडून मारहाण करणाऱ्यांना अडवताना दिसतोय. अखेर तिघेही मारहाण करणारे निघून जातानाही दिसतात.
मिळालेल्या माहितीनुसार, मानपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील आठ जणांवर केला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या व भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.