जालन्यात स्टील कंपन्यांवर फिल्मी स्टाईल छापा, कंपन्यांची नावे आली समोर

film style income tax raid on steel companies names surfaced maharashtra news
film style income tax raid on steel companies names surfaced maharashtra news

Jalana IT Raid : आयकर विभागाने जालन्यामध्ये छापेमारी करत मोठी रक्कम जप्त केली जप्त करण्यात आलेली ही रक्कम अधिकाऱ्यांना मोजण्यासाठी तब्बल 13 तास वेळ लागल्याचे समोर आले आहे. छापेमारीसाठी जाताना आयकर विभागाच्या गाड्यांवर दुल्हन हम ले जायेंगे असा आशय असल्याचे स्टीकर गाड्यांवर लावण्यात आले होते. कोट्यावधींची संपत्ती सापडल्यानंतर आता कारवाई झालेल्या कंपन्यांची नावे समोर आली आहेत.

आयकर विभागाने एसआरजे पीटी स्टील्स प्रा. लि. (SRJ Peety Steels Pvt. Ltd.) आणि कालिका स्टील अलॉयज प्रा. लिमिटेड (Kalika Steel Alloys Pvt. Ltd ) कंपन्यांवर छापे टाकले. या छाप्यात आयकर विभागाला तब्बल 390 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती.

छापा टाकण्यात आलेले व्यावसायिक बऱ्याच दिवसांपासून आयकर विभागाच्या रडारवर होते. त्यामुळे ठोस माहितीनंतर आयकर विभागाच्या सुमारे 400 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी या व्यावसायिकाच्या अनेक ठिकाणी छापे टाकले. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या स्टील व्यावसायिकांसह त्याच्या कंपन्या आणि घरांवर छापे टाकले होते. या छाप्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे, सोने आणि रोख रक्कम सापडली आहे.

film style income tax raid on steel companies names surfaced maharashtra news
IT Raid In Jalna : 390 कोटींची माया जप्त; कारवाईसाठी 'दुल्हल हम ले जायेंगे'चा कोड

गाड्यांवर 'राहुल वेड्स अंजली'चे बोर्ड

आयकर विभागाच्या या कारवाईत टीमने 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्ट रोजी सकाळी प्राप्तिकर विभागाची 100 हून अधिक वाहने जालन्यात दाखल झाली. या वाहनांवर विवाह सोहळ्याचे स्टिकर्स होते. या वाहनांवर 'राहुल वेड्स अंजली'चे स्टिकर्स लावण्यात आलेले होते. शेकडोच्या संख्येने आलेल्या या वाहनांमध्ये 400 हून अधिक आयकर अधिकारी आणि कर्मचारी होते. वाहनांचा एवढा मोठा ताफा पाहून जालनावासीयांना सुरुवातीला काहीच समजले नाही. ही वाहने कुठल्यातरी लग्न समारंभासाठी आली असावीत असे त्यांना वाटले. काही वेळाने शेकडो वाहनांतून आलेले लोक हे आयटी अधिकारी असून हे पाहुणे लग्नसमारंभासाठी आलेले नसून छापा टाकण्यासाठी आले असल्याचे समजले.

film style income tax raid on steel companies names surfaced maharashtra news
सॅमसंगचे दोन नवीन फोल्डेबल फोन लॉंच; किंमत, फीचर्स जाणून घ्या

आयकर विभागातर्फे करण्यात आलेल्या या कारवाईत अधिकाऱ्यांना कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली आहे. सुरुवातील अधिकाऱ्यांना काही आढळून आले नाही. मात्र, त्यानंतर अधिकाऱ्यांना कारवाईचा मोर्चा शहराबाहेरील आठ ते दहा किलोमीटरवरील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला. त्यावेळी तेथे कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली.

जालन्यातील या कारवाईमध्ये स्टील तीन व्यवसायिकांकडेरोख रकमेसह सोन्याचे दागिने, बिस्किटे, नाणी, हिरे आढळून आले असून, सोन्याच्या 32 किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत 16 कोटी रुपये आहे. याशिवाय अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांच्या घरं, कार्यालयांसह विविध ठिकाणांहून महत्त्वाची कागदपत्र जप्त केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com