

Shirala Fort (Kille Shirala) and Bhuyari Marg Discovery
esakal
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले बत्तीस शिराळा हे गाव ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत संपन्न आहे. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील पेठनाका येथून मलकापूर रस्त्याने अवघ्य १४ किमी. अंतरावर हे गाव वसलेल आहे. शिवरायांच्या काळात या गावात सभोवतालच्या ३२ गावांमधून महसूल जमा केला जात असे म्हणूनच या गावाला बत्तीस शिराळा हे वैशिष्ट्यपूर्ण नाव पडले. या गावात एक मजबूत भुईकोट किल्ला उभा असून त्याला किल्ले शिराळा म्हणून ओळखले जाते. याच तालुक्यात चांदोली अभयारण्याच्या घनदाट वनराईमध्ये प्रचीतगड हा दुसरा महत्त्वपूर्ण दुर्ग आहे जो पर्यटकाना आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करतो