रवींद्र मराठेंना अखेर जामीन मंजूर

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

मराठेंच्या अटकेवरून राज्यात तणाव निर्माण झाला होता. त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचा आरोपही करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही बाबीची माहिती न देता त्यांच्या विरोधी गटाने हे घडवल्याचे आरोप करण्यात आला.

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियम डावलून कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरुन बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जावर आज (बुधवार) सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान रवींद्र मराठेंना पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन मंजूर करण्यात आला. याबाबतचा निकाल पुणे न्यायालयाने दिला.

मराठेंच्या अटकेवरून राज्यात तणाव निर्माण झाला होता. त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचा आरोपही करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही बाबीची माहिती न देता त्यांच्या विरोधी गटाने हे घडवल्याचे आरोप करण्यात आला. याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कक्षेत असलेल्या बाबी पुणे पोलिस करत असल्याचा आरोपही पोलिसांवर ठेवण्यात आला होता. या सर्व महत्वपूर्ण गोष्टी लक्षात घेता मराठेंच्या जामीन अर्जावर न्यायालय काय निकाल देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आज अखेर मराठेंना जामीन मंजूर करण्यात आला. 

दरम्यान, मराठे हे बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयीकृत बँकेचे अध्यक्ष असल्याने आरबीआय अॅक्टमधील कलम 58 (ई) नुसार अध्यक्षाला अटक करण्यापूर्वी परवानगी घेणे गरजेचे असल्याचे या अर्जात सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Bail Granted for Ravindra Marathe bank of Maharashtra President